'स्वाइन फ्लू रुग्णांचा दर आठवड्याला आढावा '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई -  "स्वाइन फ्लू'बाधित तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची नोंद संबंधित महापालिकांनी दररोज ठेवावी. त्याबाबत दर आठवड्याला महापालिका आयुक्तांनी आढावा घ्यावा. तसेच स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांचा महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांत मृत्यू झाल्यास मृत्यूमागील कारणमीमांसा (डेथ ऑडिट) महापालिका प्रशासनाने सादर करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी (ता. 11) दिले. 

मंत्रालयात झालेल्या राज्य साथ रोग नियंत्रण समितीच्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार उपस्थित होते. 

डॉ. सावंत म्हणाले, की राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती दक्षता आरोग्य विभाग घेत आहे. रुग्णाचा ताप 24 तासांनंतरही कमी न झाल्यास स्वाइन फ्लूच्या निदानाची वाट न पाहता "ऑसेलटॉमीवीर'चे उपचार सुरू करावेत, असे निर्देश सर्व डॉक्‍टरांना देण्यात आले आहेत.'' "ऑसेलटॉमीवीर'चा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news Swine Flu patients Health Minister Dr. Deepak Sawant