Iran-US War
esakal
महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात आलेल्या या शासन आदेशानुसार एकूण १९ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर नागपुरातील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी चेतना तिडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.