नॉटरिचेबल आमदारांच्या घडामोडींमध्ये आता आठवलेंची उडी; म्हणाले...| MLC Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas athawale

नॉटरिचेबल आमदारांच्या घडामोडींमध्ये आता आठवलेंची उडी; म्हणाले...

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर 35 आमदारांसह नॉटरिचेबल झालेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्य सरकारचे टेन्शन वाढवले आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ट्वीट करत उडी घेतली आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Ramdas Athawale Tweet On Maharashtra Political Happening )

आठवलेंनी ट्वीट कर म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही असे थेट विधान केले आहे.

'त्या' पाच आमदारांबद्दल काँग्रेसचे स्पष्टीकरण

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह साधारण 35 आमदार नॉटरिचेबल असतानाच काँग्रेसचेदेखील पाच आमदार नॉटरिचेबल असल्याचा चर्चा समोर आल्या होत्या. त्यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या सर्व चर्चांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्वीट करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणा-या व असत्य असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदेसह नॉटरिचेबल असणारे आमदारांनी राज्य सरकारचे टेन्शन वाढवलेले असताना काँग्रेसचे कोणतेही आमदार नॉटरिचेबल नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक चर्चांना काहीसा ब्रेक लागला आहे.