जादू-टोणा केलाय म्हणून देवीच्या दर्शनाला आलोय; बच्चू कडूंचे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bachchu Kadu

जादू-टोणा केलाय म्हणून देवीच्या दर्शनाला आलोय; बच्चू कडूंचे विधान

गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यापूर्वी या सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील कामाख्य मंदीरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जादू टोणा केलाय त्यामुळे देवीच्या दर्शनाला आलोय असे म्हणत शिवसेनेच्या आरोपाला त्यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजपा सतर्क; 'आरेला कारे'चीही तयारी

एकनाश शिंदे यांच्यासह 50 आमदार सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. या बंडखोरीमुळे राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यात राज्यपाल कोश्यारींनी ठाकरे सरकारला गुरुवारी फ्लोर टेस्ट करण्यास सांगितले आहे. त्या विरोधात शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर आज संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी पार पडणार आहे.

तत्पूर्वी, जादू टोणा करून सर्व आमदारांना गुवाहाटीत नेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर जादू टोणा केलाय त्यामुळे आम्ही सर्व आमदार गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाला आलो असल्याचे प्रत्युत्तर बंडखोर आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला दिले आहे.

हेही वाचा: राज्यपाल ठरणार गेमचेंजर, राजभवनाच्या एन्ट्रीमुळे सत्तापालटावर शिक्कामोर्तब

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचे आभार मानले!

शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारानचे धन्यवाद आपण आसामच्या महापुरा साठी ५१ लाखाची मुख्यमंत्री मदत निधी केली आपले खुप आभारी आहोत, असं ट्वीट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी केलं आहे. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी आसाममधल्या पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत केली आहे.

एकनाथ शिंदेंसह बंडखोरांकडून आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Political Crises Eknath Shinde Bacchu Kadu On Shivsena Black Magic Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top