कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, विजय आमचाच कारण...

उद्या सकाळी सर्व आमदार मुंबईत पोहोचतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

गुवाहाटी : बंडखोरी करून गुवाहाटी येथे आठवडाभरापासून मुक्काम ठोकलेल्या सर्व आमदारांनी आज माँ कामाख्या देवीचे (Kamakhya Temple) श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. सर्व आमदारांनी अगदी मोकळेपणानं दर्शन घेतले. त्यामुळे कोणत्याही आमदाराला येथे बळजबरी आणले गेले नसल्याचा पुनुरुच्चार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. आमच्याकडे 40 आधिक 10 असे 50 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची काळजी नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. या देशात संविधानापुढे कोणी जाऊ शकत नाही असे म्हणत उद्या सकाळी सर्व आमदार मुंबईत (Mumbai) पोहोचतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते कामाख्या देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. (Eknath Shinde Latest News In Marathi)

Eknath Shinde
राज्यपाल ठरणार गेमचेंजर, राजभवनाच्या एन्ट्रीमुळे सत्तापालटावर शिक्कामोर्तब

शिंदे म्हणाले की, मुंबईमध्ये कधी पोहचणार यावर बोलताना आम्ही उद्या मुंबईत पोहोचू असे म्हणत शिंदे म्हणाले की, आमचे सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील. आमच्याकडे 40 अधिक 10 असे 50 चे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहे. आमच्याकडे 2/3 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही फ्लोर टेस्टची (Floor Test) चिंता नाही. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असते. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जी काही प्रक्रिया होईल त्यामध्ये आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ असा विश्वासही याेवळी शिंदे यांनी व्यक्त केला. उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचेही शिंदे म्हणाले. (Maharashta Political Crises Latest News In Marathi)

Eknath Shinde
जादू-टोणा केलाय म्हणून देवीच्या दर्शनाला आलोय; बच्चू कडूंचे विधान

मलिक, देशमुख यांची बहुमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ढवळून निघालेले राज्यातील वातावरात राज्यपाल कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) ठाकरे सरकारने बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. या विरोधात शिवसेनेकडून (Shivsena) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी पार पडणार आहे. या सर्वामध्ये राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीला मुकलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरदेखील आजच सुनावणी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही याचिकांवर सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देतं यावर राज्यातील सत्तातराचे पुढची गणित अवलंबून असल्याने न्यायालयाच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com