
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) सध्या मोठी उलथापालथ सुरूय.
मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू, 'या' तारखेपर्यंत कडक बंदोबस्त
मुंबई : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) सध्या मोठी उलथापालथ सुरूय. राज्याचे मुख्यमंत्री राजीनामा देणार की काय? या सवालावर सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळं जमाव किंवा गर्दी करता येणार नाहीय.
10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारची गर्दी करता येणार नाहीय. दरम्यान, महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय संघर्ष आणखी गडद होत चाललाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडी सरकार आणि पक्ष (शिवसेना) वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अविश्वास ठराव फेटाळला असून बंडखोर गटाला मोठा धक्का बसलाय. याविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार आहे.
हेही वाचा: 'तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला'; शिंदेंनी सांगितलं बंडखोरीचं 'कारण'
तर, दुसरीकडं शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात गोंधळ घातला असून बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केलीय. आपल्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं पुणे शहर शिवसेनाप्रमुखांनी म्हटलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व बंडखोर आमदार आणि गद्दारांना अशाच कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा: PHOTO : एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त
शिवसैनिकांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) हाय अलर्ट जारी केला असून सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलंय. सुरक्षेसाठी अधिकारी स्तरावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
Web Title: Maharashtra Political Crisis Section 144 Applies In Mumbai City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..