मंत्र्यांनो, कामकाजावेळी जागेवर बसा; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra Politics Ajit Pawar criticize Shinde fadanvis govt on development works

मंत्र्यांनो, कामकाजावेळी जागेवर बसा; अजित पवार

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्यावर बोलण्याची एकही संधी न सोडणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच तासात सत्ताधाऱ्यांना सुनावले. ‘मंत्रिमंडळ आटोपशीर असूनही मंत्र्यांचे लक्ष नाही. कामकाजात जागेवर बसायचे असते. ते बसत नाहीत. हे काही चांगले नाही,’ अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर सभागृहात हल्ला केला.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक पुकारले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे विधेयक मांडण्यासाठी जागेवर उभे राहिले. मात्र, विधेयकाच्या क्रमांकात त्यांनी चूक केली. त्यानंतरच्या विधेयकाला महाजन जागेवर नसल्याचे पवार यांनी हेरले. महाजन यांच्या दोन चुका निदर्शनास आणून देत पवार यांनी थेट सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवले. अधिवेशनाच्या तोंडावर पवार हे शिंदे-फडणवीस सरकार आणि त्यांच्या आमदारांवर सडकून टीका करीत आहेत.

त्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करीत आहेत. अधिवेशनाच्या आदल्यादिवशी तर पवार यांनी सत्ताधाऱ्यांना मस्ती आली का, असा प्रश्न विचारला होता. त्यावरून शिंदे-फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांना फटकारले होते. सत्तेत असताना काही न करणाऱ्यांनी सल्ले देऊ नये, असे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतरही पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.

Web Title: Maharashtra Politics Ajit Pawar Criticize Shinde Fadanvis Govt On Development Works

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..