3 जुलैला बंडखोर आमदार मुंबईत, भाजपा कार्यकर्ते करणार स्वागत

BJP Mumbai Unit
BJP Mumbai Unitesakal
Summary

राज्यात सध्या राजकीय घटनांनी वातावरण गढूळ होताना दिसत आहे.

मुंबई : राज्यात सध्या राजकीय घटनांनी (Maharashtra Politics crisis) वातावरण गढूळ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांच्या कथित बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आता मैदानात उतरले असून बंडोखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थितीमुळं भाजपही (BJP) सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये आलंय. भाजप मुंबई युनिटनं (BJP Mumbai Unit) आपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केलीय. रविवारी, पक्षाचे 16 आमदार आणि संसद सदस्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 500 पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलंय. शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद आणि भाजपचा यात काहीही संबंध नसल्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साही होऊ नये, असा सल्लाही बैठकीत देण्यात आलाय.

शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघात कार्यकारिणीची बैठक पार पडली. आमदारांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात बैठक घेतलीय. ज्या मतदारसंघात पक्षाचे आमदार नाहीत, अशा मतदारसंघात आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बैठकीत बीएमसी निवडणुकांबाबतही चर्चा झालीय.

BJP Mumbai Unit
Satara : गद्दारांना माफ करणार नाही; बंडखोर आमदारांविरुध्द शिवसेना आक्रमक

बैठकीदरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांना 3 जुलै रोजी विमानतळावर मोठ्या संख्येनं जमण्यास सांगण्यात आलंय. या दिवशी बंडखोर आमदार गुवाहाटीहून मुंबईत येणार आहेत, त्यामुळं त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्याचं कळतंय. सध्या शिवसेना आक्रमक झाली असून आम्हाला तयार राहावं लागेल, अशा सूचना भाजप बैठकीत देण्यात आल्या आहेत.

BJP Mumbai Unit
एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी केलं शंभूराज देसाईंचं अभिनंदन; असं नेमकं काय घडलं?

रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पक्षाच्या राज्य कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक होऊन भविष्यातील रणनीतीवर चर्चा झालीय. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपवर कोणताही निर्णय झाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याच्या वृत्तावर, पक्षाचं यावर कोणतंही मत नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com