Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारात सतराशे विघ्न; मुहुर्त लागेनाच, CM शिंदेंनी पदभार वाटला!

पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार सध्या झालेला असून उर्वरित विस्तार अजूनही प्रलंबित आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis esakal

राज्यात अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार पूर्णपणे झालेला नाही. राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन होऊन सहा महिने होत आले, पण तरीही विस्तार झालेला नाही. आता हा विस्तार आणखी लांबण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशाही काही बातम्या समोर येत होत्या. मात्र आता तोही मुहुर्त हुकणार असं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडच्या काही खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे -

  • परिवहन, सार्वजनिक बांधकाम - शंभूराजे देसाई

  • माहिती तंत्रज्ञान - उदय सामंत

  • सामाजिक न्याय - संजय राठोड

  • मृदा व जलसंधारण - तानाजी सावंत

  • अल्पसंख्यांक विकास - अब्दुल सत्तार

  • पर्यावरण, सामान्य प्रशासन - दीपक केसरकर

  • मदत व पुनर्वसन - संदीपान भुमरे

  • माहिती जनसंपर्क - गुलाबराव पाटील

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिना दीड महिन्याने पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या टप्प्यात भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातल्या ९ जणांनी शपथ घेतली. आता पुढचा विस्तार कधी होणार याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com