आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर| CM Eknath Shinde| maharashtra tour | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics crisis CM Eknath Shinde maharashtra tour

आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातील विकासकांमचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अतिवृष्टीग्रस्त भागाचीही पाहणी करणार आहेत.(maharashtra politics crisis CM Eknath Shinde maharashtra tour)

आज सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. रात्री येथेच त्यांच्या मुक्काम असेल. 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यास सुरुवात करतील.

हेही वाचा: "आम्हाला प्रतिप्रश्न विचारुन प्रश्न सुटणार नाहीत"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

मुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मालेगावचा उल्लेख जि.(जिल्हा) मालेगाव असा करण्यात आलाय. मुख्यमंत्री यांच्यां पहिल्याच मालेगाव दौऱ्यात मालेगाव जिल्हा करण्यासंदर्भात प्रस्तवावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कसा असणार मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 जुलै रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून गाडीने ठाणे शहापूर इगतपूरी (घोटी)- नाशिक मार्गे मालेगावकडे मार्गस्थ होतील. मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे रात्री दहाच्या सुमारास आगमन होईल. मालेगावी ते मुक्काम करणार.

हेही वाचा: ओबीसी आरक्षण : दिल्ली वाऱ्यांमुळे जनतेकडे दुर्लक्ष - जयंत पाटील

शनिवार (दि. 30) रोजी सकाळी 10 वाजता ते पाऊस, अतिवृष्टी पिक- पाणी आणि विकास कामे विभागीय आढावा घेणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मालेगाव शहरातील क्रिडा संकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवासस्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे मालेगाव लोकार्पण ते करणार आहेत.

यानंतर बोरी-आंबेदरी आणि दहिकुटे कालवा भूमिपूजन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगांव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, जल जिवन मिशन-दाभाडी 12 गांव, माळमाथा 25 गांव. 26 गांव पा.पु. योजना, चंदनपुरी व 32 गावांच्या वैयक्तीक पा.पु. योजना यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद असून यानंतर मालेगावी दुपारीच्या सुमारास पोलीस मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली.

हेही वाचा: Cabinet Expansion: पत्ता कट झाल्याची कुणकुण लागताच सत्तार दिल्लीत दाखल?

दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे मालेगाव येथून गाडीने औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूरकडे रवाना होतील.

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुली येथील कार्यालयास ते भेट देतील. तसेच त्यांचा स्वागत सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार सुहास कांदे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते येवला चौफुलीजवळ होणार आहे. यानंतर त्यांचा वैजापूरमध्ये मुक्काम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Politics Crisis Cm Eknath Shinde Maharashtra Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..