maharashtra politics crisis| राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर खलबतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics crisis Raj Thackeray met Devendra Fadnavis

राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(maharashtra politics crisis Raj Thackeray met Devendra Fadnavis)

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे फडणवीसांमध्ये तासभर चर्चा रंगली. सकाळी ८ वाजता राज ठाकरे सागर बंगल्यावर दाखल झाले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.

हेही वाचा: दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, BMC सुद्धा संभ्रमात

गणपती दर्शनाला घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी आल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत. त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सागरवर आले होते.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार की भाजपासाबोत युती करुन लढवणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजयाचा अश्वमेध रोखायचा विडाच भाजपाने उचललेला आहे. अशा स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेले राज ठाकरे या निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हेही वाचा: एक काश्मिरी भाजपमध्ये कसा काय जाऊ शकतो? गुलाम नबी आझादांच्या वक्तव्याने खळबळ

दोनदिवसांपूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. असे वक्तव्य केलं होतं.

Web Title: Maharashtra Politics Crisis Raj Thackeray Met Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray