Ajit Pawar: मी कायम स्पष्ट बोलतो म्हणणाऱ्या अजित पवारांनी एकेकाळी ईव्हीएमवरून घेतला होता 'यू-टर्न'

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी यांना दिलं आणि मोदी हेच देशासमोरील पर्याय आहेत असं वक्तव्य केलं.
Ajit Pawar
Ajit Pawar esakal
Updated on

Ajit Pawar U-Turn on EVM: नुकत्याच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पराभवाच्या वाटेवर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी यांना दिलं आणि मोदी हेच देशासमोरील पर्याय आहेत असं वक्तव्य केलं.

यावेळी अजित पवारांना ईव्हीएमबाबत प्रश्न करण्यात आले होते. ईव्हीएमच्या प्रश्नावरही त्यांनी सडेतोड भाष्य केलं.तेव्हा त्यांनी इव्हीएमवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर ते म्हणाले की मी स्पष्ट वक्ता आहे, भूमिका बदलत नाही.

काही वर्षांपूर्वी ईव्हीएमबाबतीत अजित पवार यांनी भूमिका वेगळी होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की माझा ईव्हीएमवर विश्वास असून कुठलीही शंका नाही. त्यावेळी ईव्हीएमची पाठराखण करणारे अजित पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते होते, दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवला होता.

त्यानंतर २०१९मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली होती. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुक घ्यावी, असं मत त्यावेळी अजित पवारांनी मांडलं होतं.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसताना भाजपला का मिळाली संधी? जाणून घ्या

त्यामुळे अजित पवार यांचं स्पष्ट वक्तव्य आणि ठाम भूमिका यातून दिसून येते. त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन दोन वेळा आपल्या विधानांवरुन 'यू-टर्न' घेतला. एकेकाळी नरेंद्र मोदींचा विरोध करणारे पवार, आता मोदींचं कौतुक करत आहेत.

तीन राज्यातील निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर अजित पवार यांनी मोदींची स्तुती केली होती आणि बीआरएस पक्षाचे नेते केसीआर यांच्यावर टीका देखील केली. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Telangana Election Result : 'तो' एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता नाहीतर....; अजित पवारांनी केलं निकालाचं विश्लेषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com