Ajit Pawar
Ajit Pawarsakal

Telangana Election Result : 'तो' एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता नाहीतर....; अजित पवारांनी केलं निकालाचं विश्लेषण

तेलंगणा वगळता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर आहे.

Telangana Assembly Election 2023 Result : चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यात तेलंगणा वगळता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर आहे. पण तेलंगणातही वेगळा निकाल दिसू शकला असता. त्याच्या कारणासह स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. (Telangana Election 2023 Result Ajit Pawar analyzed election results)

 Ajit Pawar
Chhattisgarh Election Result: रमण सिंह छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार? असा आहे राजकीय प्रवास

काय म्हणाले अजित पवार?

काही वेळा नको तितका आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं स्पष्ट मत आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जागतीक पातळीवर नावलौकिक वाढला आहे. त्यांनी गेल्या १० वर्षात मोठ्या योजना देशाच्या भल्यासाठी आणल्या.

यात रेल्वेचं जाळं वाढवलं. वेगवेगळ्या ट्रेन सुरु होताहेत, मेट्रो असतील, फ्लायओव्हर असतील. या मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत म्हणून आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याचसाठी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या भागातील जनतेनं कौल दिला. (Marathi Tajya Batmya)

 Ajit Pawar
Rajasthan Election Result 2023: राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचं काय चुकलं? काय आहेत काँग्रेसच्या पराभवाची कारणे, वाचा सविस्तर

'तो' एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता

तेलंगणात रेड्डी म्हणून जी व्यक्ती होती तो एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता त्याला काँग्रेसनं खेचलं म्हणून तेलंगणातील चित्र वेगळं दिसतंय नाहीतर तिथंही वेगळी परिस्थिती असती. तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहे ते सगळीकडं जाहीराती देत होते, महाराष्ट्रात ज्यांनी सभा घेतल्या. (Latest Marathi News)

इतक्या चांगल्या योजना राबवतोय असं त्यांनी दाखवलं. त्याची जाहिरातबाजी झाली. लोकांनी तर त्यांना नाकारलं त्यामुळं खरं काय झालं काय माहिती? जनता जनार्दन सर्वोच्च असते, अशा शब्दांत अजित पवारांनी इथल्या निकालाचं विश्लेषण केलं आहे.

 Ajit Pawar
Assembly Election 2023 : पनौती कौन?... चार राज्यांच्या निवडणूक निकालाचे कल येताच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं केलं ट्वीट

इंडिया आघाडीवर निशाणा

माझी एक विनंती आहे की. हे इंडियावाले ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असं बोलले तर आश्चर्य वाटायला नको. तेलंगणाचा कसा निकाल लागला काही नाही मोदींकडं बघून जनतेनं पाठबळ दिलं. मध्य प्रदेशमध्ये तर बरंच काही बोललं जात होतं, त्यासाठी मी तिथल्या जनतेचं मोदी-शहांचं अभिनंदन करतो.

आता जबाबदारी मोठी आहे जी आश्वासनं दिली असतील त्यासाठी तिथलं सरकार निश्चित कटिबद्ध राहिलं. मागे मी होतो सरकारमध्ये तेव्हा मी म्हणायचो की माझा ईव्हीएम घोटाळ्यावर विश्वास नाही. कारण एक व्यक्ती ही गोष्ट करु शकत नाही. हा रडीचा डाव आहे. जनतेचा कौल मान्य केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com