
Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळं टार्गेट झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचेही आरोप झाले. दरम्यान, जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध व्हायला लागल्यानंतर मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता त्यांची चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. पण नेमकी ही चौकशी काय आहे? कुठे आणि कधी होणार? याबाबत जाणून घेऊयात.