महाराष्ट्र बातम्या
Dhananjay Munde : धनंजय मुंडे समर्थक राजेंद्र घनवटची दहशत; पुण्यातील शेतकऱ्यांच्या कोट्यावधींच्या जमिनी लाटल्या, अंजली दमानियांचा दावा
Rajendra Ghanwat : विरोधात आवाज उठवणाऱ्या 9 शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोपही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पीडित शेतकऱ्यांनीही कैफियत मांडली. राजकीय ताकद वापरून लोकांच्या जमिनी लुटणाऱ्या या बिल्डरची चौकशी झाली पाहिजे.
धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या राजेंद्र घनवट नामक मुंडे समर्थकाचे नवीन कारनामे समोर आणले आहेत. राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी पुणे जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांना लुबाडून त्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. विरोधात आवाज उठवणाऱ्या 9 शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोपही दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी पीडित शेतकऱ्यांनीही कैफियत मांडली.

