कशात काय आणि फाटक्यात पाय - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics eknath shinde shiv sena rebel mla chandrakant patil mumbai

कशात काय आणि फाटक्यात पाय - चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सत्तासूत्राचे सारे ''गुण'' जुळून आल्याची चर्चा असूनही, ‘कशात काय आणि फाटक्यात पाय'', असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका अजूनही गुलदस्तात ठेवली, ''बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्याचे आमच्याशी काहीच देणे-घेणे नसल्याचेही पाटील यांनी. सांगितले सत्तांतराच्या घडामोडीने राजकीय माहोल रोजच तापत आहे. त्यात भाजप नेत्यांच्या बैठकांची मालिका सुरूच आहे. तेव्हाच, गेल्या तीन दिवसांत भाजपच्या कोअर कमिटीतील नेत्यांची चौथी बैठक सोमवारी झाली. या बैठकांत शिंदे गटासोबतच्या वाटाघाटीपासून पुढच्या रणनीतीवर विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

तरीही नियमित बैठका आहेत. त्यात कोणत्या नव्या राजकारणाची चर्चा होत नाही. त्यात शिवसेनेतील बंडखोरीशी काहीच संबंध नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणे किंवा चर्चा करण्याचा प्रश्नच नसल्याचे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ''इडी''चा समन्स आल्यावरून पाटील यांनी राऊत यांचे आरोप खोडून काढले राऊत काहीही बोलतात, असे टोला पाटील यांनी हाणला.भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही हजेरी लावली. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होण्याच्या शक्यतेने पक्षातील सर्वच नेते सक्रिय झाले आहेत.

मुंडे यांनी दुपारी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर पाटील यांच्यासोबतच त्या सागर बंगल्यावरील बैठकीला गेल्या विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे यांच्या नाराजीत भर पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्या आक्रमक होण्याची चिन्हेही होती. अशात मुंडे या पक्षाच्या बैठकीला तेही सागर बंगल्यात उपस्थित राहिल्याची चर्चा होती.

शिवसेनेपासून लांब झालेले आमदार स्वतःला बंडखोर मानत नाहीत. ते शिवसैनिकच समजतात, तेही २४ कॅरेट. भाजपला शिंदे गटाकडून प्रस्ताव आलेला नाही. मात्र, रोजच्या घटनांवर पक्षाचे लक्ष आहे. प्रस्तावानुसार पुढे चर्चा होतील. भाजप सध्या ''वेट अॅण्ड वॉच'' या भूमिकेत आहेत. सध्याच्या स्थितीत फ्लोअर टेस्टच्या मागणीची गरज वाटत नाही.

- सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते

Web Title: Maharashtra Politics Eknath Shinde Shiv Sena Rebel Mla Chandrakant Patil Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top