

Shiv Sena minister Gulabrao Patil addressing a public gathering in Jalgaon during National Voters Day, moments before his controversial remark sparked political criticism.
esakal
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने टीकेच धनी बनले आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मतदानाच्या अधिकारावर भाष्य करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत उत्तम मुद्दा मांडला, पण लगेचच एक वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे.