
Bawankule on Hindi: हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हे आपण केलेलं विधान चुकून बोललो असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र हिंदी विषय पहिलीपासून बंधनकारक करण्याला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर बावनकुळे यांचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंची आपण भेट घेणार असल्याचंही म्हटलं आहे.