शिंदेचे मावळे आमदारांच्या दिमतीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra politics politician support eknath shinde political maneuver thane

शिंदेचे मावळे आमदारांच्या दिमतीला

ठाणे : शिवसेनेचे नाराज मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह ठाण्याहून थेट सुरत गाठले. त्यानंतर गुवाहाटीच्या प्रवासात आमदारांच्या देखरेखीची मुख्य जबाबदारी ठाण्यातील माजी नगरसेवकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्या राजकीय डावपेचात त्यांचे मावळे सहभागी झाले असून त्यात माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, संजय मोरे यांच्यासह अन्य सहा ते सात माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले त्यांचे खंदे समर्थक आणि माजी नगरसेवक कामाला लागले आहेत. माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, संजय मोरे यांच्यासह अन्य सहा ते सात माजी नगरसेवक यांच्यावर शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांची देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती शिंदेसमर्थक सूत्रांनी दिली. त्यामुळे डोळ्यात तेल घालून आपल्या नेत्याने टाकलेल्या जबाबदारीवर खरे उतरण्यासाठी हे स्थानिक माजी नगरसेवक सज्ज आहेत.सुरुवातीला मुंबईहून निघालेल्या या आमदारांसाठी ठाण्यातील ‘उपवन’ येथील महापौर निवास या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी महत्त्वाची चर्चा झाल्यानंतर हे सर्व आमदार पुढे सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची माहितीदेखील आता पुढे आली आहे.

शिंदेंकडून सुरक्षा ताफा परत

मंत्री एकनाथ शिंदे हे इतर आमदारांसोबत गुवाहाटी येथे असताना शिंदे यांच्यासोबतचा असणारा सुरक्षेचा ताफा त्यांच्या ठाण्यातील घरी परत पाठवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी कोणतेही संरक्षण सोबत न घेता हा बंदोबस्त माघारी पाठवून दिला असून स्वतः वापरत असलेली गाडीदेखील परत पाठवून दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Maharashtra Politics Politician Support Eknath Shinde Political Maneuver Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top