आजारपण खोटं, CM पदासाठी उद्धव यांना आजारी पाडलं; रश्मी ठाकरेंवर मनसेची टीका

नवऱ्याच्या मुख्यमंत्रपदात रस नव्हता…
Maharashtra Politics Uddhav Thackeray Rashmi Thackeray
Maharashtra Politics Uddhav Thackeray Rashmi Thackerayesakal

Maharashtra Politics Uddhav Thackeray Rashmi Thackera राज्यात सत्तांतरानंतर रश्मी ठाकरे चांगल्यात चर्चेत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळवुन देण्यात पत्नी रश्मी ठाकरे यांचा हात असल्याचे सर्वश्रुत आहे. दरम्यान, पहिल्यांदाच मनसेने रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं असं खळबळजनक दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

रश्मी ठाकरे यांना नवऱ्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता. त्यांना आपल्या मुलाला मंत्री झालेलं पाहायचं होतं. त्यामुळेच हा आघाडीचा घाट घातला गेला. उद्धव ठाकरेआजारी होते यावर शंका उपस्थित होत आहे.

काय म्हणाले महाजन?

मुंबईत मनसेचं घे भरारी अभियान सुरू झालं आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेला प्रकाश महाजन बोलत होते. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करेल अशी शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे टापटीप राहयचे. त्यांना वाटायचं आपणच मुख्यमंत्री होऊ. पण शिवसेनेतील या जोडगोळीने एक काम केलं. अन् घरी सैरंद्रीने केस मोकळे सोडले. सैरंद्रीने केसं मोकळे सोडल्यावर काय होतं हे तुम्हाला माहीतच असेल, असा चिमटा प्रकाश महाजन यांनी काढला.

सैरंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात काही रस नव्हता. त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं. पण घरच्या तापापायी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू केला. मुळातच औकात… म्हणजे क्षमता… औकात नसलेल्या माणसाला गादीला बसवलं. मला संशय आहे की आजारपण सुद्धा खरं की खोटं होतं. कारण कारभार यांना करायचा होता. त्यामुळे यांना आजारी पाडलं अन् कारभार सुरू केला, असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं? कोरोना आला मुख्यमंत्री घरात बसले.

आज काय अवस्था आहे? तुझ्या शिवसेना भवनावर लोक दावा सांगू लागले, बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला, अशा शब्दात महाजन यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारांशी मैत्री केली, पण...

बाळासाहेबांनी आयुष्यभर शरद पवारांशी मैत्री केली, पण राजकीय सोयरीक केली नाही. बाळासाहेबांना पुढचं भविष्य माहीत होतं. त्याच पवारांनी नंतर एका दगडात दोन पक्षी मारले. उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं.

तुम्ही क्षणिक मुख्यमंत्रीपदासाठी पित्याने जपलेले राजकीय विचार सोडून दिले. केवळ मुख्यमंत्रीपदीपदासाठी विचार सोडले. त्याही पुढे शरद पवारांचा डाव होता अन् शिवसेनेचे दोन शकले झाले, असं ते म्हणाले.

खरा मर्द राज ठाकरे आहे. त्यांनी शिवसेनेची चिरेबंदी सोडून दिली. आपली भाकरी आपल्या हाताने तयार केली. ते म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. बाप भलं मोठं भांडवलं सोडून गेला होता. दहा वर्षात त्या पक्षाचं पूर्ण वाटोळं करून आता बसलेत, अशी टीकाही महाजन यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com