Maharashtra Poltical Crisis : संजय राऊत म्हणतायत, 'आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ'

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळाली, मात्र...
Maharashtra Poltical Crisis
Maharashtra Poltical Crisis
Updated on

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्याच्या चर्चेला उधाण आलं. या चर्चेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले.

काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..जय महाराष्ट्र! अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केलं आहे.

Maharashtra Poltical Crisis
सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, झिरवळ रिचेबल असून सध्या ते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत आहेत.

काल झिरवळ यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना, 'सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील, असे म्हणाले होते.

Maharashtra Poltical Crisis
Shiv Sena Case: हेच ते न्यायाधीश ज्यांच्यामुळे ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल आज लागतोय

तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार..

नरहरी झिरवाळ यांनी घटनाक्रम उलटा फिरेल असा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार मलाच मिळेल. सत्तांतराचा घटनाक्रम उलटा मागे फिरवला जाईल. त्यावेळी विधिमंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार होता. मी तत्कालीन अध्यक्ष म्हणून तो निर्णय घेतला होता.

आता जरी अध्यक्ष असलो तरी त्यावेळी मी घेतलेल्या निर्णयामुळे कोर्टाकडून मलाच संधी दिली जाईल. मी आता उपाध्यक्ष नसतो तर कदाचित ही संधी मिळाली नसती. माझ्यावर अविश्वास ठराव मांडला गेला पण तो मंजूर झाला नाही असही झिरवळ यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shivaji Shinde attack news in Parli
Maharashtra government corporation chairman news
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify
Political Shift in Malegaon Municipal Corporation
Marathi News Esakal
www.esakal.com