
राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आज पासून (19 मे) ते 25 मे दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.