पुणे, मुंबई, नागपूर मेट्रोसाठी ७१० कोटींची तरतूद

टीम ई सकाळ
शनिवार, 18 मार्च 2017

रस्ते विकासासाठी महाराष्ट्र येत्या आर्थिक वर्षात सात हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी आज (शनिवार) विधानसभेत केली. राज्याचा सन 201718 चा अर्थसंकल्प मांडत असताना ते बोलत होते.

मुंबई : पुणे, मुंबई आणि नागपूर येथील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी मिळून 710 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. रस्ते विकासासाठी महाराष्ट्र येत्या आर्थिक वर्षात सात हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी आज (शनिवार) विधानसभेत केली. राज्याचा सन 201718 चा अर्थसंकल्प मांडत असताना ते बोलत होते.

मुनगुंटीवार यांच्या भाषणातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील महत्वाचे मुद्दे असे :

 • रस्ते सुधारण्यासाठी तरतूद; सार्वजनिक बांधकाम विभागाला 4357 कोटी रुपये गेल्या वर्षी दिले; यावर्षी 7000 कोटी रुपये तरतूद;
 • रस्ते देखभाल दुरुस्ती दहा वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे असेल.
 • रस्त्याच्या सुधारणेकडे विशेष लक्ष
 • केंद्रीय मार्ग निधीमधून हाती घेतलेल्या कामसाठी विशेष तरतूद
 • 2001 ते 2013 पर्यंत 2554 कोटी 46 लाख रुपयांची कामे
 • 201415/1617 35293 कोटी 76 लाख रुपयांची कामे मंजूर
 • 252 पुलांचे काम पूर्ण होत आले आहे
 • राज्यातील मार्च 2014 पर्यंत 4571 किमी; आता 15 हजार 404 किमी काम झाले.
 • राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत फक्त 4571 किमी
 • 570 कोटी पंतप्रधान ग्राम सडक मधून मिळणार; यातून ग्रामीण भागातील रस्ते सुधारणार; याचा शेतकऱ्यांचाही फायदाच होणार आहे.
 • तीन रेल्वेप्रकल्पांसाठी 150 कोटी रुपये निधी देणार
 • डहाणूमध्ये सॅटेलाईट टर्मिनल उभारणार
 • बंदर जोडणी प्रकल्पांना चालना देण्यासाठी 70 कोटी
 • सागरमाला : 8 जेट्टीचे बांधकाम अंदाजे किंमत 71 कोटी; 50 टक्के राज्य शासन देणार
 • जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवस्था उभारणार
 • शिर्डी समाधीला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास करणार; सोलापूर, चंद्रपूर विमानतळांचाही विकास : 50 कोटी तरतूद
 • नागपूरमधील मिहान प्रकल्पांसाठी 100 कोटी; नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्चे काम सुरू झाले आहे.
 • सर्व इमारती यापुढे ग्रीन बिल्डिंग असतील.
 • सार्वजनिक बांधकाम विभागकडे देखभालीकडे असलेल्या इमारती टप्प्याअटप्याने ग्रीन बिल्डिंग करणार
 • महानिर्मिती कंपनी 750 मेगावॅटचा सौरउर्जा; 525 कोटी भागभांडवल सरकारचे; याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार
 • विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक घटकास सर्वसाधारण आणि वीजदरात प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी निधी
 • मागास असलेल्या भागात उद्योग यावेत, यासाठी 2650 कोटी रुपयांचा निधी
 • पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी; महाइन्फ्रा ही विशेष संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया; एक खिडकी म्हणून काम करेल.
Web Title: Maharashtra to provide Rs. 7000 crore for road developmet Pune Metro Nagpur Metro Mumbai Metro