

Maharashtra Government Job
ESakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील सरकारी नोकऱ्यांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. MPSC गट क सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली. महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये इच्छुक पात्र उमेदवार २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर अर्ज करू शकतात. या तारखेनंतर उमेदवारांना दुसरी संधी दिली जाणार नाही. अर्जासोबत विहित शुल्क सादर करावे लागेल.