गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतलीय. मात्र पुढील तीन ते चार दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपलं असलं तरी विदर्भात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पुण्यासह मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.