पुणे : पुणे शहरात आज (मंगळवार) वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागांत येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.