

Maharashtra Rain Forecast
esakal
Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा उघडीप घेतली असून, २७ सप्टेंबरला राज्यातील कोणत्याही भागासाठी मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असली तरी सर्वदूर पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.