esakal | थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून देवेंद्र फडणवीस म्हणाले... | Devendra fadnavis
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून देवेंद्र फडणवीस म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

यवतमाळ: "पुरामुळे (Flood) कापूस खराब झालाय. सरकारने तात्काळ भरधोस मदत केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. याबाबत कुठलेही दुमत नाही" असे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्याच्या (farmer) बाधांवर पोहोचले आहेत. पावसामुळे (rain) शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान झालय. फडणवीस यांनी स्वत: तिथे जाऊन पाहणी केली. ते यवतामाळमधील वणी गावात आले आहेत.

"मूळातच दुष्काळ मॅन्युअलमध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. ओला दुष्काळ ऐवजी पूरस्थिती म्हणून शकतो. तात्काळ आपत्ती घोषित करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे" असे फडणवीस म्हणाले. "अंतिम आणेवारीची वाट न पाहता, नजर आणेवारीवरुन शेतकऱ्याला मदत जाहीर करता येईल. आणेवारीचा खेळ बंद केला पाहिजे" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: परमबीर देशाबाहेर पळाले असतील, तर त्यामागे भाजपाचा हात - काँग्रेस

"अतिशय वाईट स्थिती आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे काळ पडतय. यातून फारस काही मिळणार नाही" असे फडणवीस म्हणाले. "विदर्भ, मराठावाड्यात तलाठी कुठेच पोहोचले नाहीयत. पंचनामे होत नाहीयत. सरकार घोषणा करते. पण अमंलबजावणी होत नाही. सरकारच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. शेतकऱ्याला मदत मिळत नाहीय. नुकसान मोठ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जवसुली तात्काळ स्थगित केली पाहिजे" असे फडणवीस म्हणाले.

loading image
go to top