Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह उपनगरात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट

गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे
mansoon update
mansoon updateesakal

राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घातला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या पुणे, मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने सोमवारी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सून परतण्यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसर बुधवारी हवामान कोरडे राहिल आणि गुरुवारी हलका पाऊस पडेल आणि त्यानंतर मान्सून परतणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com