Maharashtra Rain Update : दिलासादायक! थैमान घालणारा पाऊस उघडीप देणार; मुंबई,पुणेसह मराठवाड्यात पुढील २४ तासांत जोर ओसरणार

Marathwada Flood Update : डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे, त्यामुळे येत्या २४ तासांत पावसाचा जोर कमी होणार आहे. मराठावाड्यातील पूरग्रस्त भागाला यामुळे दिलासा मिळणार आहे.
NDRF teams rescue people in flood-affected Marathwada as IMD forecasts reduced rainfall across Mumbai, Pune, and Maharashtra.

NDRF teams rescue people in flood-affected Marathwada as IMD forecasts reduced rainfall across Mumbai, Pune, and Maharashtra.

esakal

Updated on

Summary

मुंबई, पुणे आणि मराठवाड्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नांदेडमध्ये गोदावरी नदीला, तर बीड-लातूर-धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये आठ दिवसांपासून बंद आहेत.

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मराठावाड्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे रविवारी पुन्हा अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. मुंबईत आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस कोसळत आहे. पण पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतही पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे तर पुण्यातील खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे धरणातून विसर्ग कमी करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com