राज्यात मागील २४ तासांत पावसाचे ९ बळी, तर ४९१६ जणांचे स्थलांतर

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update esakal

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, मुंबई, कोकण किनारपट्टी सोबतच मराठवाड्यात देखील पावसाने झोडपले आहे. हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान महाराष्ट्रात 1 जून 2022 पासून आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकेच नाही तर गेल्या 24 तासांत 76 पैकी 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. (Maharashtra Rain Update)

राज्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 838 घरांचे नुकसान झाले आहे आणि 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती एमजीएमटी विभाग आणि पुनर्वसन विभागाने 35 मदत शिबिरे स्थापन केली आहेत. यादरम्यान 1 जून 2022 पासून महाराष्ट्रात पाऊस/पूर-संबंधित घटनांमध्ये 125 प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी जुलै महिन्यात पावसाने जूनची भरून काढली असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे.

Maharashtra Rain Update
भीषण! नवविवाहितेच्या हत्येच्या संशय, तरूणाला रॉकेल ओतून जाळलं

हवामान खात्यानं चार दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update
बहुमत चाचणीला गैरहजर राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची 'ऑफर'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com