बहुमत चाचणीला गैरहजर राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची 'ऑफर'

Ashok Chavan
Ashok Chavanesakal

मुंबई - शिवसेनेतील 40 हून अधिक आमदारांनी फुटून वेगळा गट स्थापन केल्यापासून आणखी कोणत्या पक्षाला गळती लागणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच काँग्रेसमध्ये देखील भूकंप होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. (Ashok Chavan news in marathi)

Ashok Chavan
"ओक्केमध्ये महाराष्ट्र"; 'झाडी डोंगर हाटील'चं 'वारी' व्हर्जन; पाटलांची चर्चा

खासदार चिखलीकर म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी बहुमत चाचणीला गैरहजर राहून एकप्रकारे भाजपला मदतच केली आहे. शिवाय बहुमत चाचणीला अशोक चव्हाण यांनी चार आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे त्यांचे आभार मानने माझे काम आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करू, परंतु पक्षात घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असंही चिखलीकर यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले अशोक चव्हाण बहुमत चाचणीच्या दिवशी गैरहजर होते. त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. बहुमत चाचणीत भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटासोबत मिळून बहुमत सिद्ध केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com