Rain Update: राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात; मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे
Rain Update: राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात; मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईसह राज्याभरत पावसाचा जोर दिसून आला आहे. सुरू असलेला परतीचा पाऊस पुढचे काही दिवस असणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल पुणे, मुंबई शहर, उपनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचुन राहिलं आहे. तर पुणे शहरात वातावरण ढगाळ झाले असून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोकणासह मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com