पुढील २४ तासांत राज्यातील 'या' भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता - IMD

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे.
IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Summary

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे.

गेल्या दहा ते १२ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, तो राजस्थान ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. भारतीय हवामान खात्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार काही भागात पावसाला सुरुवात केली आहे.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
उद्धव काढणार 'हुकमी एक्का'; तेजस ठाकरे घेणार आदित्य यांची जागा?

भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात येत्या शनिवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

IMD : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा नारायण राणेंचा कट; केसरकरांचा गंभीर आरोप

'या' जिल्ह्यांना असेल पावसाचा येलो अलर्ट

रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com