सातारा, मराठवाड्यातील काही भागांत पाऊस; इतर जिल्ह्यांमध्ये आज सरी कोसळणार

राज्यातील काही भागांमध्ये आज विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
rain
rainsakal
Updated on

कोल्हापूर : राज्यातील काही भागांमध्ये आज शुक्रवारी (ता.आठ) विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Metrological Department) वर्तवली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. साताऱ्यातील खटाव व परिसरातील अनेक गावांमध्ये आज दुपारी तीनच्या आसपास वादळी वारे, मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाने (Rain) अचानक हजेरी लावली. परिणामी सुगीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. (Maharashtra Rain Updates Rainfall In Some Parts Of State)

rain
सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना मिळणार दिलासा, दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांसह आंब्याला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी तीनच्या आसपास खटाव व आजूबाजूच्या गावांना पावसाने चांगलेच झोडपले. जाखणगाव येथे अर्धातास हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जांब, बिटलेवाडी, आमलेवाडी, कोकराळे आदी अनेक गावांत शेतात काढून ठेवलेला गहू, हरभरा, कांदा भिजला. तसेच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले. घराच्या भिंती, पत्रे यांचेही नुकसान झाले. कांदा, टोमॅटो पिकांसह आंब्याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे खांबही भुईसपाट झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा गायब झाला. सोसाट्याचा वारा ,विजांचा कडकडाट व त्यासोबत मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. मात्र दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या पावसाने हैराण झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला.

rain
Latur Rain | अवकाळी पावसामुळे आंबा अन् ज्वारीचे नुकसान

मराठवाड्यात पाऊस

मराठवाड्यातील परळीत १० मिनिटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. दुसरीकडे उस्मानाबादेतील येडशी रिमझिम पाऊस झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.