Maharashtra Rain Alert
esakal
ऐन दिवाळीत राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई-उपनगरासह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांना पावसानं झोडपून काढलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पाऊस पडतो आहे. महत्त्वाचे म्हणजे आता पुढचे चार दिवस राज्यात पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.