esakal | Corona Updates : राज्याचा रिकव्हरी रेट ९५.३५ टक्क्यांवर!
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

राज्यात आतापर्यंत ५८ लाख ५२ हजार ८९१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १ लाख १ हजार १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Corona Updates : राज्याचा रिकव्हरी रेट ९५.३५ टक्क्यांवर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद गेल्या काही दिवसांपासून होऊ लागली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात १० हजार ८९१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १६ हजार ५७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात २९५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली. (Maharashtra reports 10,891 new COVID-19 cases and 295 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत ५८ लाख ५२ हजार ८९१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १ लाख १ हजार १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या राज्यात १ लाख ६७ हजार ९२७ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.३५ टक्के तर मृत्यू दर १.७३ टक्के झाला आहे.

हेही वाचा: पीक कर्जासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या

राज्यातील प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत ३ कोटी ६९ लाख ७ हजार १८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५८ लाख ५२ हजार ८९१ (१५.८६ टक्के) नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राज्यात सोमवारपर्यंत २ कोटी ४४ लाख ११ हजार ३४९ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. सोमवारी दिवसभरात २ लाख ९३ हजार ९८४ जणांना लस देण्यात आली.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.