esakal | महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय?
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांवरील आरोप, तुरुंगवास आणि अखेर सुटका

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज, पुतण्या समीर यांना देखील न्यायालयाने दोषमुक्त केले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास केला होता. (What is Maharashtra Sadan Scam all you need to know)

  1. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिले. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर होता. ११ जून २०१५ साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता.

  2. छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांकडून साडे तेरा कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याविरोधात २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर एकूण ६० साक्षीदार होते. सक्तवसुली संचलनालयाने याच आरोपपत्राचा आधार घेत छगन भुजबळ यांच्यावर ही कारवाई केली होती.

हेही वाचा: छगन भुजबळ निर्दोष मुक्तता : अंजली दमानीयांचं आव्हान!

3. चमणकर एंटरप्रायजेस या कंपनीला भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. चमणकर यांना हा कंत्राट मिळण्यासाठी भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, चमणकर यांच्या कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतले होते. सक्तवसुली संचलानालयाने केलेल्या आरोपांनुसार छगन भुजबळ आणि त्यांचे कुटूंबीयांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता.

4. निविदा न मागवता चमणकर एंटरप्रायजेसला कंत्राट देण्यात आला आणि तत्कालीन बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना या चमणकर एंटरप्रायजेसकडून मोठा आर्थिक फायदा झाला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने भुजबळ यांनी मोठा घोटाळा केल्याचा दावा सुद्धा तपास यंत्रणांनी केला होता.

5. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आणि भुजबळ यांच्यावर कारवाई सुरु झाली होती. मार्च २०१६ साली भुजबळ यांची १० तासांपेक्षा जास्तवेळ चौकशी करण्यात आली होती, यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन वर्ष ते तुरुंगात होते.

loading image
go to top