

Summary
1️⃣ साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ माजली आहे.
2️⃣ मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
3️⃣ पीडित डॉक्टर मूळच्या बीड जिल्ह्यातील असून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या.
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये जिल्हा उपरुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणात पीडित मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली डॉक्टर महिला फलटणयेथे कार्यरत होती. या प्रकरणावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.