Pune Corporation Election : अमित शहा पुणे महापालिकेत; भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा पुणे महापालिकेत; भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

अमित शहा पुणे महापालिकेत; भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच महापालिका भवनातील कार्यक्रमासाठी निमंत्रित केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी अमित शहा कार्यक्रमास येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमीपूजन आणि महापालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांचे इतर काही कार्यक्रम असल्याने महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांनी या कार्यक्रमासाठी महापालिकेत यावे यासाठी फिल्डींग लावली होती. त्यानुसार इमेल देखील केला होता. त्यास दुजोरा मिळाला आहे.

हेही वाचा: संचारबंदी आणि इंटरनेटचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

महापालिकेची निवडणूक पुढच्या काही महिन्यांवर आली, त्यापूर्वी शहरातील जायका, नदी सुधारणा प्रकल्प यासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पिंपरी-चिंचवड, पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी करण्याची धडपड भाजपची सुरू आहे. त्यासाठी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना पुण्यात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. याची वाट न पाहता अमित शहा हे पुण्यात येत असताना त्यांना महापालिकेत आणून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडण्याची तयारी भाजपने सुरू केली. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास अमित शहा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व इतर नेते कार्यक्रमासाठी येणार आहेत. तसेच गणेश कला क्रीडा मंच येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. यासंदर्भातील तयारी करण्यासाठी आज (मंगळवारी) सायंकाळी महापौर बंगल्यावर तयारीची बैठक झाली, त्यास मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बीडकर यांनी दुजोरा दिला.

loading image
go to top