Corona Update : राज्यात रुग्ण संख्या नियंत्रणात; मात्र मृत्यू वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update : राज्यात रुग्ण संख्या नियंत्रणात; मात्र मृत्यू वाढले

मुंबई : राज्यात रुग्ण संख्या नियंत्रणात असून आज 999 नवे रुग्ण सापडले. मृतांची संख्या मात्र पुन्हा वाढली असुन आज 49 रुग्ण दगावले. शुक्रवारी 41 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. आज 1020 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,66,913 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.64 % एवढे झाले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

आज मृतांचा आकडा मात्र वाढला असून आज 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1,40,565 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 12,219 इतकी आहे.आज 999 रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,23,344 झाली आहे.

हेही वाचा: गडचिरोलीत पोलिसांनी केलेली कारवाई ऐतिहासिक - गृहमंत्री वळसे पाटील

औरंगाबाद, कोल्हापूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 36,नाशिक 6, पुणे 3, लातूर 2, अकोला 1, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,719,432 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top