
Maharashtra Govt : सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला लावला चुना? दिवसाला 19 लाखांची उधळपट्टी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती उघड झाली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे, असा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासू फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.
जाहिरातींचे राज्य शासनाकडून हे देयके उपलब्ध झाले आहेत. यात धक्कादायक माहिती अशी की, खर्चाची सरासरी काढली तरी दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे, असे आरटीआय (RTI) कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.
आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिरातींवर खर्च केलेल्या निधीची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे दिसून येते. जनतेच्या खिशातल्या शासकीय पैशांची ही वारेमाप उधळपट्टी आहे. त्यामुळे सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकूश लावेल का? आणि जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का? असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.