Maharashtra SIR Deadline : महाराष्ट्रात SIR ची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली; सुप्रीम कोर्टाने फटकारताच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Voter List Claims : निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांनंतर महाराष्ट्रासह पाच राज्यांत दावे-आक्षेप नोंदवण्याची मुदत वाढवली आहे. महाराष्ट्रात आता १३ नोव्हेंबरपर्यंत दावे व आक्षेप नोंदवता येतील ,पूर्वीची मुदत २६ ऑक्टोबर होती.
Maharashtra SIR Deadline Extended to November 13

Maharashtra SIR Deadline Extended to November 13

Updated on: 

Maharashtra SIR Deadline Extended to November 13 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून ( SIR) देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आयोगाने काही राज्यांमध्ये दावे आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत वाढवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, आता राज्यातील नागरिकांना १३ नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीसंदर्भात दावे आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. तसेच महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मसुदा मतदार यादीतून नाव वगळल्या गेलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...