

Smart Meter Electricity Maharashtra
esakal
Smart Meter Controversy : राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला ग्रामीण भागातून मोठा विरोध होत असतानाच सरकारकडून ही प्रक्रिया नियमांनुसार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिले वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला, तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगितले. मात्र, विरोधी आमदारांनी सरकारवर दबाव टाकून स्मार्ट मीटर बसविण्याचा आरोप करत ही मोहीम तातडीने थांबविण्याची मागणी केली. यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला.