Shocking video shows ST bus conductor drunk on duty in Maharashtra : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील एक कंडक्टर ड्युटीवर असताना दारूच्या नशेत धुंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. धावत्या बसमध्ये कंडक्टर इतका मद्यधुंद होता की, त्याला व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते.