
Summary
प्रवाशांना ऐन सणासुदीच्या काळात दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले गेले.
वाढीचा फायदा एसटीला आर्थिकदृष्ट्या व्हायचा पण लोकांचा विरोध झाला.
शिवनेरी व शिवाई यांना सुरुवातीपासूनच वाढ लागू नव्हती; इतर बसांवरूनही आता ती मागे घेण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीसाठी साठी तिकिट दरात केलेली वाढ आता मागे घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार ही हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. दिवाळीच्या हंगामात दरवर्षी ही भाडेवाढ करण्यात येत असते. यावर्षीही भाडेवाढ करण्यात आली होती मात्र आज दुसऱ्याच दिवशी प्रवाशांना दिलासा देत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.