
MSRTC buses lined up at a depot in Maharashtra ahead of the festive season fare hike announcement.
esakal
Summary
यापूर्वी जानेवारीत १५% वाढ झाल्याने प्रवासी आधीच नाराज आहेत.
वाढीमुळे दिवाळीत जास्त प्रवासी मिळाल्याने एसटी महामंडळाला आर्थिक फायदा होणार.
शिवनेरी आणि शिवाई बसेससाठी मात्र जुन्या दरानुसारच तिकिटे मिळणार आहेत.
आधीच पूरस्थितीने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता ऐन सणासुदीच्या काळात आणखी कात्री बसणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ दिवाळीसाठी असून एसटीच्या तिकिट दरामध्ये दहा टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. एसटीकडून दरवर्षी ही हंगामी दरवाढ करण्यात येते.