Maharashtra ST NCMC Smart Card Deadline Extended Till September 1
esakal
एसटी प्रवासात शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे कार्ड प्रत्यक्षात मिळाले नसल्याने राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे.