
मुंबई: महागाई भत्ता, वेतनवाढीतील फरक, दिवाळी भेट रकमेसह विविध प्रलंबित मागण्यांकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखा ‘टीझर’ सादर केला. राज्यभरातील ५००पेक्षा अधिक कामगार प्रतिनिधींनी पेटत्या मशाली आणि मागण्यांचे फलक हातात घेत दादर येथे निदर्शने केली. येत्या रविवारी (ता.१२) होणाऱ्या आंदोलनाचा हा ‘टीझर’ सादर करून एसटी प्रशासनाला गंभीर इशारा देण्यात आला.