
Maharashtra Stamp Duty: लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्यानं महसूल वाढीसाठी मुद्रांक शुल्काच्या दरात १०० रुपयांवरुन ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसत होता. पण आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे.